Saturday, September 17, 2016

आर्टिलरी सेंटर, नाशिक येथे सैन्यभरती


            पुणे, दि.17 जिल्हृयातील सर्व माजी सैनिक/विधवांना कळविण्यात येते, की  खाली नमुद केलेल्या सैन्यातील ट्रेनिंग सेंटरमध्ये युनिट सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक माजी सैनिक/विधवांचे पाल्यांनी  सैन्यभरतीसाठी  त्या ठिकाणी  3 ते 5ऑक्टोबर,2016 रोजी उपस्थित राहावे.

            भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 10 वी / 12 वी चे मुळ मार्कशिट व सर्टिफिकेट, मुळ निवास प्रमाणपत्र, रिलेशन सर्टिफिकेट, 20 कलर पासपोर्ट फोटोग्राफ, एन.सी.सी.सर्टिफिकेट,प्रमाणपत्र असेल तर, मुळ डिस्चार्ज बुक, मुळ पी.पी.., मुळ पेन्शनबुक. वरील सर्व कागदपत्राचे 2 अटेस्टेड झेरॉक्स संचसह भतीचे वेळेस घेऊन यावे,   असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल बिपिन द. शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment