Thursday, September 22, 2016

नव मतदारांना नोंदणीसाठी 9 ऑक्टोंबरपर्यंत संधी


सोलापूर दि.22 : - आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणूकीसाठी निवडणूक कार्यालयाकडून 18 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर कालावधीत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी 3 हजार 290 मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांची नियुक्ती केली आहे. शिवाय प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी कालावधी संपेपर्यंत कायमस्वरुपी अधिका-यांची नियुक्ती केली आहे. याठिकाणी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6, मतदार यादीतील नाव वगळणेसाठी नमुना 7, मतदार यादीतील तपशिलात बदल करण्यासाठी नमुना 8, विधानसभा मतदारसंघांतर्गत पत्ता बदल करण्यासाठी नमुना 8 अ हे अर्ज उपलब्ध आहेत. शिवाय प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 16 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. यावर 14 ऑक्टोंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार  आहेत. या हरकतींवर 16 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. हरकतींवरील सुनावणी झाल्यानंतर 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी सतिश धुमाळ यांनी पत्रकान्वये दिली आहे.

                                                                0 0 0 0 0 

No comments:

Post a Comment