Wednesday, September 21, 2016

माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांचा दौरा


                सातारा, दि.21 (जिमाका) : कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
                गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, पुणे येथून शासकीय वाहनाने मौजे-जाशी, ता.माण जि.साताराकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता मौजे, जाशी, ता.माण जि.सातारा येथे  आगमन. दुपारी 3.30 वाजता शहिद लान्सनाईक कै.चंद्रकांत शंकर गलंडे यांच्या कुटुंबियांची भेट. स्थळ- मौजे, जाशी, ता.माण जि.सातारा. दुपारी 4 वाजता मौजे, जाशी, ता.माण जि.सातारा येथून शासकीय वाहनाने कराड जि.साताराकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता कन्याशाळा चौक, मंगळवार पेठ, कराड जि.सातारा येथे आगमन.मा.श्री.विक्रम विनायकराव पावसकर, नगरसेवक व जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, सातारा जिल्हा यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास तसेच ललिता बाबर यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती. स्थळ कन्याशाळा चौक, मंगळवार पेठ, कराड जि.सातारा. सायंकाळी 7 वाजता कराड, जि.सातारा येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.

0000

No comments:

Post a Comment