Wednesday, September 21, 2016

मंजूर शासन निधीतून विकास कामे अंतिम करण्यासाठी पालखी तळांची विभागीय आयुक्तांकडून पहाणी

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग

 मंजूर शासन निधीतून विकास कामे अंतिम करण्यासाठी
पालखी तळांची विभागीय आयुक्तांकडून पहाणी

बारामती, (.मा.का.) दि. 21: तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत शासन मंजूर निधीतून विकास कामे अंतिम करण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील मुक्काम रिंगण असलेल्या गावातील पालखी तळांची पहाणी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत आज  करण्यात आली.
या समितीमध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता आर. एस. रहाणे, तीर्थक्षेत्र विकास मंडळाचे विशेष कार्यअधिकारी श्री. चव्हाण, पुणे शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील, बारामतीचे मुख्याधिकारी निलेश देशमुख, इंदापूरचे मुख्याधिकारी नानासाहेब कामटे, संत तुकाराम पालखी सोहळा प्रमुख अभिजीत महाराज मोरे, देहू संस्थांनचे अध्यक्ष शांताराम महाराज मोरे, सुनिल दिगंबर मोरे, सुनिल दामोदर मोरे यांच्यासह स्थानि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
  तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत शासन मंजूर निधीतून विकास कामे अंतिम करण्यासाठी तुकाराम महाराज पालखी मार्गावरील मुक्काम रिंगण असलेल्या बारामती इंदापूर तालुक्यातील गावातील पालखी तळांची पहाणी आज करण्यात आली. यामध्ये बारामती तालुक्यातील उंडवडी पालखीतळ, बारामती शहरातील शारदा प्रांगण, वसंतराव पवार नाट्यगृह, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची येथील नवीन बाजार तळ, इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोरी प्रांगण, सणसर येथील पालखीतळ, बेलवाडी रिंगण स्थळ, आंथुर्णे पालखी तळ, गोतोंडी, निमगाव केतकी, इंदापूर येथील आयआयटीआय कॉलेज परिसरातील नियोजित पालखी तळ, नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर, बावडा येथील विसाव्याची जागा, तसेच सराटी येथील पालखी तळ तसेच नियोजीत पालखी तळाच्या जागेची पहाणी करण्यात आली.
या पहणीनंतर  तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत शासन मंजूर निधीतून पालखी तळांचा विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत शौचालये, भक्त निवास, सभामंडप, मेघडंबरी, पाण्याची व्यवस्था, ड्रेनेजची व्यवस्था, पालखीतळ सपाटीकरण, आवश्यक ठिकाणी पक्के जोड रस्ते, जुन्या सभामंडपांचा विकास करण्यात येणार आहे. या पाहणी दौऱ्यानंतर मंजूर निधीतून विकास कामे निश्चित करण्यात येणार आहेत.
**********




No comments:

Post a Comment