Monday, September 26, 2016

येत्या गुरूवारी प्रशिक्षणाचे आयोजन


सोलापूर दि. 26: - राष्ट्रीय निवृत्ती वेतन  योजनेंतर्गत निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांनी प्राधिकृत केलेल्या क्रक्स मॅनेजमेंट सर्व्हीस मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशिय सभागृहात येत्या गुरूवारी म्हणजे 29 सप्टेबर 2016 रोजी  सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आहरण संवितरण अधिका-यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
          त्यानुसार सोलापूर शहरातील सर्व आहरण संवितरण अधिकां-यासाठी सकाळी 10 ते  दुपारी  1 तर सर्व तालुक्यातील आहरण संवितरण अधिका-यांसाठी दुपारी 2 ते 5 या वेळेत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिका-यांनी  लाभ घ्यावा असे आवाहन  जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी एका पत्रकाव्दा्रे केले  आहे.
000000

No comments:

Post a Comment