Tuesday, September 27, 2016

औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र परीक्षेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत


पुणे, दि. 27 (विमाका) :  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून सलग 2 वर्षाचे प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येते. इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी पुन:श्च दोन वर्षात बारावीचे अध्ययन पुर्ण करावे लागते. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने 15 जुलै 2016 रोजी 'कौशल्य दिनी' औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रवेशपात्रता व्यवसाय अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना इयत्ता बारावीच्या प्रमाणपत्रासाठी केवळ दोन विषय देणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षा संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.
प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 10 व 11 डिसेंबर 2016 रोजी होणार असून यासाठी दिनांक 30 सप्टेंबर 2016 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईचे उपसंचालक योगेश पाटील यांनी केले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्जासाठी www.nios.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर nios.ac.in/media/documents/prospectusforITILearners.pdf अंतर्गत सदर योजनेबाबत सविस्तर माहिती पुस्तिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या पुस्तिकेचे अवलोकन केल्यास ऑनलॉईन अर्जाचा नमुना पहावयास मिळेल. उमेदवाराला ऑनलाईन अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्ववल्यास जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संपर्क साधावा. सदर अर्ज करण्यासाठी एक विशेष काऊन्टर मुंबई येथे Advanced Training Institute, Directorate General of Training, Ministry of skill Development and Entrepreneurship, V.N.Purav Marg, Sion (East), Mumbai - 400 022 (दूरध्वनी क्रमांक 022-24053560) सुरु करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात Advanced Training Institute यांच्याद्वारे  निर्गमित करण्यात आलेली जाहिरात व माहिती देखील सहपत्रित करण्यात येत आहे, असे आवाहनही केले आहे.

00000

No comments:

Post a Comment