Tuesday, September 27, 2016

पोलीस क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ


                             



            सोलापूर दि. 27 : पोलीस क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातून सुमारे 125 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. येथील पोलीस मुख्यालयातील मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धा येत्या गुरुवारपर्यंत सुरु राहणार आहेत.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक      एस. वीरेश प्रभु यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन सोहळा झाला.
            यावेळी श्री. डोंगरे म्हणाले, “ खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक असायला हवा. कारण खेळामूळे शरीर तंदुरुस्त राहते त्याचबरोबर मानसिक संतुलनही राहते. खेळामूळे सांघिक भावना वाढीस लागते. कार्यक्षमता सुधारते त्यामुळे या स्पर्धा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढीस लावण्यास हातभार लावेल
         पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभु यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धांमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मनावरील ताण कमी होण्यास हातभार लागणार आहे. येथे चांगली कामगिरी करणारे खेळाडू पुढील टप्प्यावर यशस्वी होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
     स्पर्धेत पंढरपूर, सोलापूर ग्रामीण, बार्शी आणि मुख्यालय असे संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी संचलनाद्वारे पाहुण्यांना मानवंदना दिली.
     क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आल्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे श्री. डोंगरे यांनी जाहीर केले. यावेळी दहावी–बारावी परिक्षेत उल्लेखनीय यश मिळविणा-या पोलीसांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले आणि पोलीस उपअधीक्षक दिलीप चौगुले यांनी संयोजन केले.
                                      0000

No comments:

Post a Comment