Wednesday, September 21, 2016

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना


                सातारा, दि.21 (जिमाका) : केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2016-2017 करीता वरील शिष्यवृत्ती साठी सादर करण्यात येणा-या सुधारित अर्ज संकेत स्थळ www.ksb.gov.in येथे उपलब्ध आहेत. तरी सातारा जिल्हयातील सर्व माजी सैनिक, विधवांना कळविण्यात येते की, अर्ज हा ऑन लाईन पध्दतीने भरावयाचा आहे. पात्र पाल्याचे अर्ज भरण्याकरीता सर्वांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर.जाधव यांनी केले आहे.
                ही शिष्यवृत्ती व्यावसायीक शिक्षण पहिले वर्ष व त्या पुढील वर्षांसाठी असते. उदा- इंजिनियरिंग, बी.टेक, बी.एड, बी.डी.एस, एम.बी.बी.एस, बी.बी.ए, बी.सी.ए, बी.फार्म इत्यादी. तसेच या शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक पात्रता 10+2 किंवा पदवी परीक्षेत कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. पूर्ण भरलेले अर्ज ऑन लाईन पध्दतीने भरुन दि.31 ऑक्टोंबर 2016 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर  प्राप्त होणा-या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन श्री.जाधव यांनी केले आहे.
0000
               
               


No comments:

Post a Comment