Wednesday, September 28, 2016

मतदार जनजागृतीसाठी ग्रामसेभेच आयोजन


            सातारा दि. 28 (जि.मा.का.) राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी दि.1 ऑक्टोबर 2016 रोजी महिला सभा आणि 2 ऑक्टोबर 2016 रोजी सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे विशेष आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 262 सातारा विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार  जावली (मेढा) यांनी दिली.
            262 सातारा विधानसभा मतदार संघाअंतर्गत जावली तालुक्यात एकूण 152 मतदान केंद्रांचा समावेश होतो. निवडणुकांच्या अनुषंगाने जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याकरीता आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ग्रामसभांच्या यशस्वीतेसाठी तालुकास्तरावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची प्रत्येक केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदार जागृती अभियानात आठवडे बाजारात पथनाटय, चर्चासत्रासारखे कार्यक्रम घेण्याच्या सूचना गटविकास अधिकारी पं.स.जावली यांना देण्यात आलेल्या आहेत. विविध स्पर्धा, सूचना फलक, स्फूर्ती गीते याव्दारे प्रचार करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळा व कार्यालयांमधून गांधी जयंती आणि नेहरु जयंती अशा महत्वाच्या दिवशी प्रभातफेऱ्या व विविध स्पर्धांच्या माध्यमातून मतदार जन जागृती करण्यात येणार आहे.
            मतदार नोंदणी कार्यक्रम दि.16 सप्टेंबर 2016 ते 14 ऑक्टोबर 2016 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तरी ज्यांनी अद्यापही मतदार नोंदणी केली नाही अशा सर्वांनी या मतदार जनजागृती अभियानाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 262 सातारा विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार जावली यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment