Tuesday, September 27, 2016

अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांसाठी विशेष घटक योजना


               सोलापूर दि. 27  : अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्रय रेषेवर आणण्यास सहाय्य करण्याचे दृष्टीने शासनाच्या कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) सन 1982 पासून राज्यात राबविण्यात येते. सन 2016-17 या आर्थिक वर्षात ही योजना राज्यात राबविण्यासाठी शासनाने दि. 30 जुलै 2016 च्या शासननिर्णयानुसार रु.19634.31 लाख निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय  व वित्तीय मान्यता दिलेली असून निधी जिल्हास्तरावर उपलब्ध करुन दिलेला आहे, असे उपसंचालक कृषी आयुक्तालय, पुणे यांनीकळविले आहे.
                या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीनवबौध्द प्रवर्गातील शेतकऱ्यांना जमिन सुधारणा, निविष्ठा पुरवठा,पीक संरक्षण, शेतीची सुधारीत  अवजारे, इनवेल, बोअर, पंपसंच, पाईपलाईन, जुनी विहिर दुरुस्ती, नवीन विहिर, बैलजोडी, रेडेजोडी, बैलगाडी, शेततळे, तुषार व ठिबक सिंचन संच, ताडपत्री, तसेच परसबाग इत्यादी बाबींसाठी अनुदान देय आहे.  या बाबींपैकी  जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार आहेत अशा लाभार्थींना जास्तीत जास्त 1 लाख कमाल मर्यादेपर्यंत तर नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार नाहीत अशा लाभार्थींना रुपये 50 हजार कमाल मर्यादेर्यंत वरील पैकी केवळ एका घटकांसाठी अनुदान देय आहे. जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार आहेत त्यांना इतर बाबींचा देय राहणार नाही. योजनेंतर्गत निवड झाल्यापासून दोन आर्थिक वर्षापर्यंत लाभ देय राहील.
                पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे. लाभार्थी अनुसुचित जाती, नवबौध्द वर्गातील असणे बंधनकारक आहे, जमीनीच्या 7/12 व  8 - अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे, दारिद्रय रेषेवरील शेतकऱ्यांसाठी उत्पन्न मर्यादा रु.50 हजार चे मर्यादेत व उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे, लाभार्थींची जमीनधारणा 6 हेक्टर पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे, दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य. तसेच योजना राबविणारी यंत्रणा- जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावर गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती अशी आहे.
                या योजनेच्या लाभाचे स्वरुप पुढीलप्रमाणे- अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांच्या कृषी विकासाकरीता अनुदान मर्यादा पुढीलप्रमाणे. जमिन सुधारणा (1 हेक्टर मर्यादेत) 40 हजार रुपये, निविष्ठा वाटप (1 हेक्टर मर्यादेत) 5 हजार रुपये मर्यादेत. पीक सरंक्षण व शेतीची सुधारीत अवजारे 10 हजारच्या मर्यादेत. बैलजोडी, रेडेजोडी  30 हजार रुपये मर्यादेत. बैलगाडी 15 हजार रुपयांच्या मर्यादेत. जुनी विहिर दुरुस्ती 30 हजाराच्या मर्यादेत. इनवेल बोअरिंग 20 हजारच्या मर्यादेत. पाईप लाईन 20 हजारच्या मर्यादेत 300 मिटर पर्यंत.  पंपसंच 20 हजार रुपयांच्या मर्यादेत. नवीन विहिर 70 हजार ते  1 लाख रुपयांच्या मर्यादेत. शेततळे 35 हजार  रुपयांच्या मर्यादेत. परसबाग कार्यक्रम 200 रुपये प्रती लाभार्थी. तुषार व ठिबक सिंचन संच 25 हजार प्रती हेक्टरी मर्यादेत. ताडपत्री 10 हजारच्या मर्यादेत आहे.

No comments:

Post a Comment