Tuesday, September 27, 2016

मा. उपराष्ट्रपती यांच्या दौऱ्याबाबत आढावा बैठक संपन्न


पुणे दि. 27: -  मा. उपराष्ट्रपती यांच्या दि. ऑक्टोबर २०१६  रोजीच्या पुणे येथील दौऱ्याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पोलीस महानिरिक्षक (गुप्तवार्ता ) श्री. कृष्ण प्रकाश, ग्रामीण पोलीस अधिक्षक जय जाधव, पोलीस उपायुक्त (वाहतूक ) मुंढे, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) शंकरराव जाधव आदिची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले की अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्याचा यापूर्वीचा अनुभव असतो. तरीही प्रत्येक दौरा नविन आव्हान समजून समयसूचकतेने, सतर्क राहून सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले.
            या बैठकीत सदरील दौऱ्याच्या अनुषंगाने विविध विभागाने पार पाडाण्याच्या जबाबदारीबाबत  सविस्तर सूचना देवून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थिती केलेल्या शंकेचे निरसन मार्गदर्शन करण्यात आले.


००००

No comments:

Post a Comment