Sunday, September 18, 2016

मराठवाडा शंभर टक्के जलयुक्त होण्यासाठी स्वयंसेवी संस्थांसह सर्वांनी पुढे यावे - हरिभाऊ बागडे




        मराठवाडा भूषण पुरस्कारांचे वितरण
पुणे. दि. 18 (विमाका):  मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता गरजेची आहे. त्या दृष्टीकोनातून राज्यशासन राबवित असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत तेथील प्रत्येक माणसाने सहभागी झाले पाहिजे. मराठवाड्यातील शंभर टक्के गावे जलयुक्त व्हावीत यासाठी शासनाच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्था, दानसूर व्यक्तीनी पुढे यावे, असे आवाहन विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केले.
मराठवाडा समन्वय समिती (पुणे) यांच्या वतीने मराठवाडा मुक्तीदिन महोत्सवाचे आयोजन येथील बालगंधर्व रंगमंदिरात काल करण्यात आले. त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, उपाध्यक्ष किशारे पिंगळीकर, सचिव दत्ताजी मेहेत्रे आदीची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाड्यातील जनतेला उर्जितावस्था द्यावची असेल तर शेतीचे उत्पादन वाढल्याशिवाय चालणार नाही, असे सांगून श्री बागडे म्हणाले की, शेतीसाठी पाण्याची शाश्वत सोय यासाठी महत्वपूर्ण गरज असणार आहे. गेल्या काही वर्षात अत्यंत कमी पावसाने येथील संपूर्ण ग्रामीण अर्थकारण कोलमडून गेले. त्यातही पडलेल्या पावसाचे पाणी साठ‍विण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्यामुळे वाहून गेले आणि पाण्याचा दुर्भिक्षाला सामोरे जावे लागले. आता मात्र गेल्या दोन वर्षापासून जलयुक्त शिवार योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे केली जात आहेत, असेही ते म्हणाले.
            मराठवाड्यातील जलसंधारणाच्या कामात नामसह अनेक स्वयंसवी संस्था काम करत आहेत ही चांगली बाब आहे. मात्र प्रत्येक गाव जलयुक्त व्हावे यासाठी अजूनही संस्था, दानसूर व्यक्ती व गावातील लोकांनी पुढे यावे. पाण्याबरोबरच दर्जेदार शिक्षणाची सोय ही मराठवाड्याची महत्वाची गरज आहे, असेही श्री बागडे यावेळी म्हणाले.
            कुमार सप्तर्षी म्हणाले की, मराठवाड्यातील संतानी मानवता जपली, महाराष्ट्राची मन घडवली. मराठवाडा शेकडो वर्षे पारतंत्र्यात होता.  त्यामुळे संघर्ष करुन मिळावलेल्या स्वातंत्र्याचा योग्य लाभ घेतांना संर्भमावस्था निर्माण झाली मात्र आता तेथील लोक  विविध क्षेत्रात पुढे येत आहेत ही चांगली बाब आहे.
श्रीठाले पाटील म्हणाले कीमराठवाडा नेहमी इतरांचा विचार करीत राहीलामराठवाड्यांनी महाराष्ट्राला खूप काही दिले आहे.मराठवाड्याच्या विकासाचा विचार करता तेथे कृषी क्षेत्रात सद्या काम सुरु आहेतमात्र विज्ञान क्षेत्रात अधिक काम होण्याची गरज आहे.
मराठवाडा भूषण पुरस्कारांचे वितरण
या कार्यक्रमात 'मराठवाडा भूषण 2016' पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेत्याअंतर्गत प्रशासकीय क्षेत्रातील पुरस्कारलातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले (जलयुक्त शिवार अभियानातील उत्कृष्ट कार्य), शेक्षणिक क्षेत्रस्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठ (नांदेडचे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर, कृषी क्षेत्रकृषी भुषण पुरस्कार प्राप्त परभणी येथील आदर्श शेतकरी कांतराव देशमुख, कला, साहित्य क्षेत्र निर्माता दिग्दर्शक दिलीप खंडेराय, सामाजिक क्षेत्र पुरस्कार : 'आपल घर', अनाथ मुलांचे आश्रम नळदुर्ग यांना पुरस्कार वितरित करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान मराठवाडा भूषण पुरस्कार्थीशी सुत्रसंचालकांनी प्रकट संवादही साधला. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र 2019 योजनेचा लाभ योग्यप्रकारे घेत चांगली दर्जेदार कामे केल्यास जमिनीचे पुनर्भरण होऊन निश्चितच पाण्याची समस्या सुटेल असा विश्वास व्यक्त केला. डॉ. विद्यासागर यांनी विज्ञानाचा मानवी चेहरा साहित्याच्या माध्मातून पुढे आण्यावर सतत काम होत राहण्याची गरज व्यक्त केली. तसेच यावेळी कांतराव देशमुख, दिलीप खंडेराय तसेच 'आपले घर' संस्थेचे प्रतिनिधी श्री. पोतदार यांनीही मनोगत व्यक्त केले.
मराठवाडा समन्वय समितीच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या पुण्यातील  विविध महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी 10 ते 15 रुपये या अल्पदरात एक वेळेचे भोजन देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असून याचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते 'वैभवशाली मराठवाडा 2016' वार्षिक विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
 कार्यक्रमात दिलीप खंडेराय यांच्या चमूने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मराठवाड्याची वैशिष्टे असलेली लोककल, विविध तालवाद्यावर आधारित लेझीम आदी रंगतदार कार्यक्रमानी बहार आणली.
प्रस्ताविकात समितीचे अध्यक्ष आणि उद्योजक श्री धुरगुडे पाटील यांनी सांगितले की, मराठवाडा दुष्काळात खूप पोळला आह. आता जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात होतात. येथील युवकांनी नोकरी व व्यवसायाकडे वळले पाहिजे. नोकरी, शिक्षणासाठी मराठवाड्यातून पुण्यात येणाऱ्या युवकांसाठी समितीने वस्तीगृह चालू केले. त्यांना अल्पदरात जेवनाची सोय केली आहे. या उपक्रमाला सहभाग देण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे यावे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. शोभा कुलकर्णी यांनी केले.
0000

No comments:

Post a Comment