Friday, September 23, 2016

मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्याकडून विविध योजनांचा आढावा


            पुणे, दि. 23 – विविध शासकीय योजनेबाबतच्या कामांची आढावा बैठक राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली आज यशदा येथे संपन्न झाली. विविध विभागांचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी तसेच इतर विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या पूर्ततेबाबत आणि सद्य परिस्थितीतबाबत या बैठकीत मुख्य सचिवांनी आढावा घेतला.
            यशदा येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीस महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव पुरुषोत्तम भापकर,  विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते.
            आधार कार्डाच्या नोंदणीचे आणि संलग्नीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मुख्य सचिवांनी दिल्या. सेवा हमी कायद्याला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.  आतापर्यत सुमारे दोनशे सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पुढील काळात उर्वरित सेवा ऑनलाईन उलपब्ध करुन देण्यात येणार असल्याने   यासंदर्भातील प्रक्रिया सुटसुटीत करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी मुख्य सचिवांनी जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे, विहीरी खोदणे, कृषी पंपांना वीज जोडणी, स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना, विशेष घरबांधणी योजना, सेवा हमी कायदा, ई-म्युटेशन आदी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा  घेतला.
            बैठकीला विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महावितरण व कृषी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
000 00000

No comments:

Post a Comment