Tuesday, September 20, 2016

धोम व कण्हेरचा अतिरिक्त विसर्ग कालव्याद्वारे खरीप पिकासाठी सोडा -पालकमंत्री विजय शिवतारे


                सातारा, दि. 20 (जिमाका)  : धोम व कण्हेर प्रकल्पामध्ये सध्या 99 टक्के पाणीसाठा झाल्याने अतिरिक्त विसर्ग नदीमधून सोडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खरीप पिकासाठी कालव्याद्वारे सोडावे, असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज दिले.
                पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात याबाबत बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, कण्हेर विकास विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली नारकर, धोमचे कार्यकारी अभियंता योगेश दाभाडे, विशेष भूमीसंपादन अधिकारी अमृत नाटेकर आदी उपस्थित होते.
                धोम व कण्हेर प्रकल्पामध्ये सध्या 99 टक्के पाणीसाठा झाला आहे. धोम प्रकल्पामध्ये 3150 क्युसेक्स इतकी पाण्याची आवक आहे तर कण्हेर प्रकल्पामध्ये 1360 क्युसेक्स आवक आहे. त्यामुळे धोम व कण्हेर प्रकल्पातून नदीमध्ये विसर्ग सोडण्यास येत आहे. हे नदीमधून वाया जाणारे पाणी थेट धोम, कण्हेर तसेच धोमबलकवडी कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या खरीप पिकासाठी सोडण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी यावेळी दिले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना निश्चित चांगला फायदा होईल.
0000

No comments:

Post a Comment