Monday, September 26, 2016

पुणे ग्रामीण जिल्हयात प्रतिबंधात्मक आदेश जारी


           पुणे,दि.26 : पुणे ग्रामीण जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 23सप्टेंबर, 2016  ते दि. 6 ऑक्टोबर 2016 रोजी या कालावधीमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी  करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र मुठे यांनी दिली आहे.
              पुणे ग्रामीण जिल्ह्यात दि. 23 सप्टेंबर, 2016  ते दि. 3 ऑक्टोबर 2016 रोजी या कालावधीमध्ये बारामती येथे मराठा समाजाचा मुक मोर्चा, उपराष्ट्रपती यांचा पुणे जिल्हयातील दौरा तसेच नवरात्र उत्सव, मोहरम सण साजरा होणार आहे. त्यामुळे या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 14 दिवसांच्या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. यानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे, शस्त्रेसोटेभाले,तलवारी, दंड, काठ्या बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगणेकोणत्याही इसमाचे, चित्राचे, प्रतीकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांचे चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सभ्यता अगर नितिमत्ता राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे वर्तन करणे यास मनाई करण्यात येत आहे.   तसेच मोठ्याने घोषणा देणेमिरवणूक काढणेभाषण करणेअविर्भाव करणेसभा घेणेपाच किंवा पाचपेक्षा अधिक इसमांचा जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील,असे आदेशात नमूद केले आहे.
जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.
         तसेच हा आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधीत व्यक्ती मुंबई पोलीस अधिनियम,1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.
****

No comments:

Post a Comment