Thursday, September 22, 2016

शासनातर्फे 15 लाख रुपये धनादेशाचे शहिदाच्या कुटुंबियांना वितरण शहीद चंद्रकांत गलंडे यांचे बलिदान देशाला अभिमानास्पद -माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर


                सातारादि.22 (जिमाका) : शहीद चंद्रकांत गलंडे यांचे बलिदान देशासाठी अभिमानास्पद आहे. शासन सदैव त्यांच्या कुटूंबियांच्या पाठीशी राहील, अशा शब्दात माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज शहीद चंद्रकांत गलंडे यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.  महाराष्ट्र शासनाच्यावतीने 15 लाख रुपये मदत निधीचा धनादेश त्यांनी यावेळी वडील शंकर गलंडे यांच्याकडे सुपूर्त केला.
माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी शहीद चंद्रकांत गलंडे यांच्या जाशी येथील घरी आज भेट देऊन कुटूंबियांचे सांत्वन केले.  यावेळी माजी सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल सुहास जतकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, सरपंच सविता गलंडे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, सांगलीच्या माजी नगरसेविका नीता केळकर आदी उपस्थित होते.  
सर्वप्रथम माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी शहीद चंद्रकांत गलंडे यांच्या  प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी शहीद चंद्रकांत गलंडे यांच्या आई सुलाबाई, वडील शंकर गलंडे, पत्नी निशा, भाऊ केशव आणि मंजाबापू यांची  भेट घेऊन माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांत्वन केले. ते यावेळी म्हणाले, राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आज येथे आलो आहे.  राज्य शासनाच्यावतीने आपल्या कुटूंबाला सर्वतोपरी मदत केली जाईल.  शासन सदैव आपल्या पाठीशी आहे, असे सांगून राज्य शासनाच्यावतीने मदत निधीचा धनादेश त्यांनी वडील शंकर गलंडे यांच्याकडे दिला.  शहीद चंद्रकांत यांच्या मुलांना प्राथमिक सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी, वीरपत्नीला नोकरी तसेच अन्य सुविधा देण्याबाबत माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सैनिक कल्याण विभागाच्या संचालकांना आदेश दिले.
यावेळी शहीद चंद्रकांत यांच्या पत्नी निशा तसेच वडील शंकर गलंडे या दोघांनीही पाकिस्तानचा बदला घ्यायला हवा. आमच्या कुटूंबावर डोंगर ढासळला, त्याची भीती वाटत नाही. पण पाकिस्तानचा सूड घ्या, अशी भावना बोलून दाखवली.  यावेळी निश्चितपणे शासन त्याबाबत योग्य निर्णय घेईल, असे आश्वासन श्री. पाटील-निलंगेकर यांनी दिले. यावेळी उपसरपंच उत्तम पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
000
 44 व्या सातारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे चैत्राली गुजर यांच्या हस्ते उद्घाटन
सातारादि. 22 (जि.मा.का) : अंतरराष्ट्रीय धावपटू चैत्राली गुजर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन 44 व्या सातारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर मुख्यालय, सातारा विभाग, कराड विभाग, वाई विभाग, फलटण विभाग, दहिवडी विभाग व पाटण विभागाच्या खेळाडूंनी मानवंदना दिली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) दीपक हुंबरे, उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे, राखीव पोलीस निरीक्षक पांडूरंग सूर्यवंशी, प्रभारी पोलीस अधीक्षक (गृह) ए.डी. फडतरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक शशिकांत भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी चैत्राली गुजर यावेळी म्हणाल्या, पोलीस कर्मचारी हे आपले कर्तव्य संभाळून क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतात ही कौतुकाची बाब आहे. तुम्ही आपल्या खेळांमधून चांगले प्रदर्शन करावे. खेळाच्या माध्यमातूनआपल्या राज्याचेदेशाचे नाव उज्ज्वल करा, असे सांगून त्यांनी  खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले,  सातारा जिल्ह्याला सांस्कृति वारसा आहे. या जिल्ह्याने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. खेळाडूंचा सन्मान करणे हे पोलीस दलाचे कर्तव्य आहे. चैत्राली गुजर यांचा आज पोलीस दलातर्फे सन्मान करण्यात येत आहे. यातून युवक-यवुतींनी  प्रोत्साहन घेवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे.
पोलीस दलातील खेळाडू कर्मचाऱ्यांनी वर्षभर सराव केला पाहिजे, असे सांगून पोलीस अधीक्षक संदीप पाटील पुढे म्हणाले, पोलीसांनी  आपले आरोग्य चांगले ठेवणे हे महत्वाचे आहे. आहार कोणता घेतला पाहिजे या विषयाची सी.डी. प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात येणार आहे. नुकतीच सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा झाली. यामध्ये पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. पुढच्या वेळी होणाऱ्या हील मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा. प्रत्येकवेळी मुख्यालय संघ वरचढ ठरत असतो. यावेळी दुसऱ्या कोणत्याही संघाने विजेतेपद मिळविल्यास   प्रत्येक खेळाडूला 5 हजार रुपये बक्षिस दिले जाईल.  क्रीडा स्पर्धा याताणतणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. अशा क्रीडा स्पर्धांमधून सांघिक भावना वाढीस लागते.  या क्रीडास्पर्धांमधून आपल्या जिल्ह्याचा नाव लौकीक वाढवावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांनी केले तर आभार अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी मानले. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस विभागातील अधिकारीकर्मचारीनागरिमोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment