Wednesday, September 28, 2016

जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन


          सोलापूर दि.28 : - सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत प्रतिवर्षी  1 ऑक्टोंबर  हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून येत्या 1  ऑक्टोबर रोजी  सकाळी 10.30 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, सात रस्ता, सोलापूर याठिकाणी जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
           या कार्यशाळेत ज्येष्ठ नागरिकांच्या अनुषंगाने त्याच्या संदर्भांतील कायदे तसेच विविध योजनांची माहिती , त्याबाबत करावयाची अंमलबजावणी आदी संदर्भांत माहिती देण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

                                                                  0 0 0 0 

No comments:

Post a Comment