Tuesday, September 20, 2016

मोटार वाहन कायद्याबाबत


सातारा, दि. 20 (जिमाका) :  मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 18 वर्षाखालील वाहन चालविणा-या मुलासंदर्भात वाहन मालकास शिक्षा करण्याची तरतूद आहे. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम चार पोटकलम (1) अन्वये सार्वजनिक ठिकाणी 50 सीसी पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणा-या व्यक्तीस व कलम अठरामध्ये सार्वजनिक ठिकाणी 20 वर्षा खालील व्यक्तीस व्यावसायीक वाहन चालविण्यास मान्यता नाही. मोटार वाहन कायद्याच्या कलम 180 मध्ये 18 वर्षाखालील व्यक्तीने वाहन चालविल्यास वाहन मालकास तुरुंगवास किंवा रु.1 हजार पर्यंत दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा आहे याची सर्व नागरिकांनी  नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment