Wednesday, September 21, 2016

सुक्ष्म, लघु, मध्यम घटकाकरिता सामुहिक प्रोत्साहन योजना


सातारा, दि.21 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या  उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली कार्यालयामार्फत सुक्ष्म, लघु व मध्यम घटकाकरिता सामुहिक प्रोत्साहन योजना-2013 राबविण्यात येते, या योजनेअंतर्गत उद्योग घटकांना त्याच्या स्थिर गुंतवणुकींच्या प्रमाणत मुद्रांक शुल्क माफी प्रमाणपत्र, विक्रीकर माफी, व्याज अनुदान विद्युत शुल्क माफी इ.सवलती देण्यात येतात. या योजनेची अंमलबजावणी उद्योग विभागात ऑनलाईन पध्दतीने करणे अनिवार्य केलेली आहे. तरी जिल्हयातील सर्व उद्योजकांनी सामुहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गतचे अर्ज http;//www.di.maharashtra.gov.in  या वेब साईटव्दारे सादर करावे, असे आवाहन सातारा जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती व्ही.बी.सोने यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment