Tuesday, September 20, 2016

वायू सेना पुणे येथे नोकरी मेळावा


                सातारा, दि. 20 (जिमाका) डायरेक्टोरेट जनरल ऑफ रिसेटलमेन्ट, अर्मी हेडक्वार्टर्स आणि वायू सेना मुख्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर 2016 रोजी केंद्रीय विद्यालय, एअर फोर्से स्टेशन, लोहगाव, पुणे येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये नोकरी मेळावा अयोजित केला आहे. जिल्हयामधून निवृत्त होत आहेत असे सैनिक आणि माजी सैनिक जे नोकरी करु इच्छित आहेत त्यांनी www.dgrindia.com (Link-ESM JOB FAIR,AIR FORCE STATION, PUNE) हया वेबसाईट वर किंवा 020-26341217 हया फोन नंबरवर आपली नाव नोंदणी करावी. तरी या संधीचा फायदा जास्तीत जास्त सैनिक, माजी सैनिंकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर.जाधव यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment