Monday, September 26, 2016

पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुणे दि. 26: पर्यटन सर्वांसाठी-प्रचालन सार्वत्रिक प्रवेशाचा ही थीम घेवून यावर्षी पर्यटन दिन साजरा करण्यात येत आहे. दि. 27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापकांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, दि. 27 सप्टेंबर रोजी पर्यटन दिन आहे. या निमित्त दि. 15 ते दि. 30 सप्टेंबर 2016 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. तसेच पर्यटन दिनी दि. 27 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर बसस्थानक सेंट्रल बिल्डींगच्या आवारात पथनाट्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय, लोहगाव विमानतळावरील माहिती आरक्षण केंद्रावर पर्यटकांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.
*******

No comments:

Post a Comment