Friday, September 23, 2016

जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यांनी प्रबोधन करावे -जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे


सातारा, दि.23 (जिमाका) : जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यांनी गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानांना प्रतिसाद मिळण्यासाठी  नागरिकांचे प्रबोधन करावे. तसेच  गरजु लाभार्थ्यांची नावे नव्याने नोंदवावीत, असे आवाहन जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी आज केले.
जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला सुनीता गुरव, वसंत गिरीगोसावी, हणमंतराव वाघ, अशा पंडीत, वासुदेव माने, राजेंद्र माने आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सुरुवातीला विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. श्रीमती बारवे पुढे म्हणाल्या, प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या सदस्यांची यादी त्यांच्या संपर्क क्रमांकासह दर्शनी भागात लावावी, अशा सूचना त्यांना देण्यात येतील. सर्व सदस्यांनी स्वस्त धान्य दुकानांना भेटी द्याव्यात. दुकानदार तसेच लाभार्थी यांच्या समस्या, अडचणी जाणून घ्याव्यात. त्या निश्चितपणे सोडविण्यात येतील. तालुका सदस्यांच्या संपर्कात राहून समन्वय साधण्यासाठी तालुक्याच्या बैठकांनाही उपस्थित राहण्याविषयी सर्व तहसीलदारांना सूचना देण्यात येतील.
सदस्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडे जावून अत्यंतोदय, बीपीएल लाभार्थ्यांच्या यादी पाहून खातरजमा कराव्यात. खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांनी गावामध्ये प्रबोधन करावे, असे सांगून काही समस्या, तक्रारी असतील तर त्या मला सांगाव्यात त्या तपासून सोडविण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी शेवटी दिले. वासुदेव माने यांनी सर्वांचे आभार मानले.

0000

No comments:

Post a Comment