Friday, September 23, 2016

लिपिक टंकलेखक सरळसेवा भरती परिक्षेच्या उत्तरसूचीबाबत आवाहन


सोलापूर दि. 23:  दिनांक 4 सप्टेंबर 2016 रोजी लिपिक टंकलेखक सरळ सेवा भरती 2016 च्या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये एकूण 07 उपकेंद्रावर लेखी परिक्षा घेण्यात आलेली आहे.या लेखी परीक्षेमध्ये एकूण A,B C,D अशा एकूण 4 संचामध्ये प्रश्नपत्रिका होत्या. या सर्व प्रश्नपत्रिकांची अंतिम  उत्तरसूची सोलापूर जिल्ह्याच्या  व मे. महाऑनलाईन लि. मुंबई यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे http://solapur.gov.in व http://maharecrutment.mahaonline.gov.in वर दिनांक 23 सप्टेंबर 2016 रेाजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
                                                            000

No comments:

Post a Comment