Thursday, September 29, 2016

जनरल बंगा स्कॉलरशिप स्किम


पुणे,दि.29: पुणे जिल्हयातील ई.एम..कोरमधून निवृत्त झालेले ज्या माजी सैनिकांचे पाल्य शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये इंजिनिअरींगच्या प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना प्रतिवर्ष रु.75,000/- एवढी रक्कम जनरल बंगा स्कॉलरशिप म्हणून डायरेक्टर जनरल, ई.एम..कोर,नवी दिल्ली यांचेमार्फत देण्यात येते. ई.एम.. कोरमधून निवृत्त झालेल्या (अधिकारी सोडून) सर्व माजी सैनिक /विधवांनी त्यांचे पाल्यांचे विहित नमून्यातील अर्ज त्वरीत डायरेक्टर जनरल,  .एम.. कोर, नवी दिल्ली यांचेकडे परस्पर पाठवावेत. अर्जाचा  नमूना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे असे  कर्नल बिपिन शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000


No comments:

Post a Comment