Tuesday, September 27, 2016

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचा प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर


सातारा, दि.27 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका 2017 करीता प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी यांनी आरक्षण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील, सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) बाबत सोडत काढण्याचा दिनांक 5 ऑक्टोबर 2016 आहे. तसेच तहसिलदार यांनी पंचायत समिती निर्वाचक गणासाठी आरक्षणाची सोडत दि. 5 ऑक्टोबर 2016 रोजी काढावयाची आहे, अशी माहिती नोडल ऑफिसर तथा उपजिल्हाधिकारी यांनी दिली.
                महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम 12, उपकलम (1) कलम 58(1)() प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 1966 नुसार अनुक्रमे निवडणूक विभाग व निर्वाचक गण प्रसिध्द करण्यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.  त्याकरीता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरिता खाली दर्शविल्याप्रमाणे विशेष सभा आयोजित केली आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :-सातारा जिल्हा परिषद, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा. वेळ- दुपारी 2.00 वाजता दिनांक. 5 ऑक्टोबर 2016, पंचायत समिती सातारा शाहू कला मंदिर, सातारा  वेळ- सकाळी 11.00 वाजता दिनांक 5 ऑक्टोबर 2016,पंचायत समिती कोरेगाव पंचायत समिती सभागृह , कोरेगाव वेळ- सकाळी 11.00 वाजता दिनांक 5 ऑक्टोबर 2016, पंचायत समिती जावली ( मेढा)       यशोदिप मंगल कार्यालय, तहसिल कार्यालय जावली (मेढा) शेजारी वेळ- सकाळी 11.00 वाजता दिनांक 5 ऑक्टोबर 2016, पंचायत समिती वाई देशभक्त किसनवीर सभागृह पंचायत समिती वाई वेळ- सकाळी 11.00 वाजता दिनांक 5 ऑक्टोबर 2016,पंचायत समिती महाबळेश्वर पंचायत समिती सभागृह महाबळेश्वर वेळ- सकाळी 11.00 वाजता दिनांक 5 ऑक्टोबर 2016, पंचायत समिती खंडाळा किसनवीर सभागृह पंचायत समिती खंडाळा वेळ- सकाळी 11.00 वाजता दिनांक 5 ऑक्टोबर 2016, पंचायत समिती फलटण प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतीक भवन फलटण वेळ- सकाळी 11.00 वाजता दिनांक 5 ऑक्टोबर 2016,पंचायत समिती माण (दहिवडी)डी. एस. पाटील सभागृह, तहसिल कार्यालय माण शेजारी दहिवडी वेळ- सकाळी 11.00 वाजता दिनांक 5 ऑक्टोबर 2016,पंचायत समिती खटाव( वडूज)पंचायत समिती खटाव (वडूज) बचत हॉल वेळ- सकाळी 11.00 वाजता दिनांक 5 ऑक्टोबर 2016,पंचायत समिती कराड कै. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) कराड वेळ- सकाळी 11.00 वाजता दिनांक 5 ऑक्टोबर 2016,पंचायत समिती पाटण रणजितसिंह पाटणकर सभागृह, बाजार तळ पाटण वेळ- सकाळी 11.00 वाजता.दिनांक 5 ऑक्टोबर 2016 असा आहे.
                जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे त्यांनी वरील ठिकाणी वेळेत हजर राहावे, असेही नोडल ऑफिसर तथा उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
0000


No comments:

Post a Comment