Monday, September 19, 2016

मराठा मोर्चा पार्श्वभूमीवर वाहनधारकांना आवाहन


सोलापूर दि.19 : - नगर जिल्हयातील कोपर्डी गावात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ  तसेच इतर मागण्यासाठी संभाजी चौक,पुना नाका,सोलापूर शहर याठिकाणी  गाव आणि तालुका  पातळीवरून  मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सुमारे पन्नास हजार दुचाकी , तीस हजारांहून अधिक चारचाकी वाहने आणि आठ – दहा लाख लोक उपस्थित राहतील , असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त् केला जात आहे. 
                           यावेळी शहरातील वाहतूकीची कोंडी तसेच नागरीकांची गैरसोय  होऊ नये म्हणून तालुकास्तरावरून येणारी अवजड वाहने सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सोलापूरकडे येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अन्य वाहने ये जा करू शकतील . पोलीस प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार  पुणेकडून येणारी वाहने – आत्मशांती ढाबा, मोहोळ /  बार्शीहून येणारी वाहने – बार्शी शहरातच / तुळजापूर रस्त्यावरून येणारी – उळे गावाजवळ / हैराबादकडून येणारी – मुळेगाव तांड्याजवळ / विजापूरकडून सोलापूरकडे येणारी – वडकबाळ, ता.दक्षिण सोलापूर/ अक्कलकोटकडून येणारी – अक्कलकोट शहरातच / होटगी गावकडून – होटगी गावाजवळ / मंगळवेढ्याकडून येणारी – मंगळवेढा शहरातच थांबतील. वाहनधारक व वाहन चालकांनी या बाबत नोंद घेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, तसेच अत्यावश्यक सेवेची वाहने सुरु राहतील, महामार्गाच्या एका बाजूने वाहतुक सुरु राहील. अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
                                                            0 0 0 0 

No comments:

Post a Comment