Thursday, September 22, 2016

सहकार पुरस्कार - अर्जाबाबत आवाहन



सोलापूर दि.22 : - सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या सहकारी संस्थांना राज्य सरकारच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पात्र इच्छुक संस्थांनी 7 ऑक्टोंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत.
              सहायक निबंधक, उपनिबंधक या कार्यालयात सहकार विभागाच्या तालुका कार्यालयात या पुरस्काराचे प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्हयातील उत्कृष्ट काम करणा-या जास्तीत जास्त सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन उपनिबंधक श्री. आघाव यांनी केले आहे.

                                                               0 0 0 0 0­­­­­

No comments:

Post a Comment