पुणे, दि. 16 : सन 2015-16
मध्ये सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या
संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने
गतवर्षीप्रमाणे सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. तरी इच्छुक संस्थांनी सविस्तर प्रस्ताव तयार करुन ज्या
तालुक्यात त्यांचे मुख्यालय आहे त्या तालुक्याचे संबंधीत सहाय्यक निबंधक/उपनिबंधक यांच्या
कार्यालयात 7 ऑक्टोबर 2016
पर्यत सदर करावेत.
यासंदर्भातील अधिक माहितीसाठी संस्थांनी
संबंधीत सहाय्यक निबंधक/उपनिबंधक /विभागीय
सहनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सहकार विभागामार्फत प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment