पुणे,दि. 17
: जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये निवृत्तीवेतन
प्रदान आदेश ग्रंथालय
नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कामामुळे 15 ऑक्टोबर,2016 पर्यत निवृत्ती वेतन शाखेचे कामकाज सकाळी 10
ते दुपारी 1 या कालावधीमध्ये
सुरु राहणार आहे. दुपारी 2 ते 6 या कालावधीमध्ये ग्रंथायाचे कामकाज करण्यात येणार असल्याने निवृत्तीवेतन विषयक सर्व कामकाज
बंद राहील.
निवृत्तीवेतनधारकांना
आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांचे
निवृत्तीवेतन विषयक कामकाजासाठी उपरोक्त कालावधीत सकाळी 10
ते दुपारी 1 या वेळेमध्येच येवून करावीत. या बदलाची नोंद घेवून सहकार्य
करावे असे आवाहन, वरिष्ठ
कोषागार अधिकारी संजय राजमाने यांनी केले आहे. उपरोक्त नमूद कालावधीनंतर निवृत्ती
वेतन शाखेचे दैनंदिन कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहील.
0000
No comments:
Post a Comment