पुणे,दि. 17
: माजी सैनिक/विधवांच्या
पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्ड,
नवी दिल्ली यांचेमार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती
दिली जाणार आहे. ज्या
पाल्यांना इयत्ता १२ वी परीक्षेत किमान 60टक्के गुण मिळविले आहेत व त्यांनी एम.
बी. बी.
एस., BUMS, BNYS,
BVSc & AH, BAMS, BHMS, BDS, B.Pharm, D Pharm, B.Sc., BASLP, B.Arch.,
B.Tech., BEMS, BS, BHMCT/HM, BFSC, BFA, BPlan, BMC, BJMC, BMM, B.Ed, BPEd, BA,
LLB (Integrated) तसेच ज्या
पाल्यांनी पदवीपरीक्षेमध्ये किमान 60 टक्के गुण मिळवले
आहेत व त्यानी एम.बी.ए./एम.सी.ए. या अभ्यासक्रमासाठी
प्रवेश घेतला आहे अशा पाल्यांना सदर शिष्यवृत्ती
दिली जाणार आहे. पंतप्रधान
शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे असून सदरहु अर्ज केंद्रिय सैनिक
बोर्ड, नवी दिल्ली यांचे www.ksb.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी लाभार्थ्यानी वेबसाईटर देण्यात आलेल्या
Annexurar-१,२,३ च्या प्रती जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी, Principal/Dean/Registrar व बँक मॅनेजर यांची स्वाक्षरी घेऊन सोबत ठेवावेत. सर्व लाभार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची
प्रिंटआऊट सोबत ठेवावी. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून ई-मेलद्वारे देण्यात
आलेल्या तारखेस अर्ज व त्यासोबत
जोडलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती घेऊन पडताळणीकरीता
उपस्थित राहावे. अर्ज भरण्याची अंतिम
तारीख 10 नोव्हेंबर, 2016
असून सदर तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यानी आपल्या अर्जाची पडताळणी जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयाकडून करुन घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल
बिपिन द. शिंदे यांनी
प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
00000
No comments:
Post a Comment