Thursday, September 1, 2016

“लोकराज्य” शासन आणि जनतेला जोडणारा दुवा -तहसिलदार हनुमंत पाटील


बारामती (उ.मा.का) दि.01: शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे लोकराज्य मासिक हे शासन आणि जनता यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. या लोकराज्य मासिकांचे सर्वांनी वर्गणीदार होण्याचे आवाहन तहसिलदार हनुमंत पाटील यांनी केले. 
शिर्सुफळ येथील महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजना मेळाव्यात बारामती उप माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिक प्रदर्शन स्टॉल मांडण्यात आला होता. या स्टॉलला भेट दिल्यानंतर तहसिलदार श्री. पाटील बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषद सदस्या लताताई भोसले, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष राहूल तावरे, शिर्सुफळच्या सरपंच जवाहर सोनवणे, उपसरपंच अनिता हिवरकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, उप अधिक्षक भूमीअभिलेख अमरसिंह पाटील, उप माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक संग्राम इंगळे, कर्मचारी रमेश क्षीरसागर, भीमराव गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या दालनात लोकराज्यचे विविध विशेषांक ठेवण्यात आले होते. या मेळाव्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी अत्यंत कुतुहलाने लोकराज्यचे अंक पाहिले. लोकराज्य विषयीची माहिती अनेकांनी घेतली. यामध्ये स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, गृहिणी, ज्येष्ठ नागरीकांसह सर्व वयोगटातील नागरीकांचा सहभाग होता. लोकराज्यचे नियमित वाचक असणाऱ्यांनीही आपुलकीने या दालनाला भेट दिली व आपल्या प्रतिक्रीया नोंदविल्या. यावेळी लोकराज्यसाठी वार्षिक वर्गणीदारही करण्यात आले.
**********

No comments:

Post a Comment