Thursday, October 6, 2016

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत आवाहन


सोलापूर दि. 06: - विद्यार्थी, सेवा निवडणूक इतर कारणाकरिता जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावासोबत 100 रुपयांचा स्टँप पेपर शपथपत्र देता सर्व शपथपत्रे कोऱ्या कागदावर करण्याचे आवाहन विभागीय जाती प्रमाणपत्र  पडताळणी समिती क्रमांक एक सोलापूर कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.
                त्याचबरोबर महसूल, वन विभागाच्या 1 जुलै 2004 च्या राजपत्रानुसार लोकहितास्तव जात प्रमाणत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र तसेच शासकीय कार्यालये  न्यायालय यांच्या समोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क्माफ करण्यात आले आहेजात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावासोबत जोडण्यात येणारे शपथपत्र यापुढे कोऱ्या कागदावर देण्यात यावे, असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment