सोलापूर दि. 06: - पोगूल स्पिनिंग मिलकडून येणे असलेल्या आपल्या कायदेशीर देय रक्कमाचे दावे नाव, पत्ता, खाते, देय रक्कम इत्यादी बाबतीत आवश्यक त्या पुराव्याच्या तपशीलासह सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सोलापूर या कार्यालयाकडे दिनांक 18 ऑक्टोबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. कामगारांकडून देय रक्कमांचे दावे प्राप्त झाल्यानंतर ते पुढील कार्यवाहीसाठी मा. अवसायक, उच्च न्यायालय मुंबई यांचेकडे सादर करण्यात येतील. जे कामगार दावे दाखल करणार नाहीत त्यांच्या देय रक्कमाबाबत कार्यवाही करता येणार नाही. तरी सदर मिलमधील कामगारांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment