77 हजार नवउद्योजकांना लाभ : कर्ज वितरणात सोलापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर
सोलापूर दि. 06: - नवउद्योजक घडावेत यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुद्रा बँक योजनेतून सोलापूर जिल्ह्यात 77 हजार 458 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून
253.35 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीनिवास पत्की यांन दिली.
नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे. शिशु, किशोर आणि तरुण या तीन गटात योजना विभागण्यात आली आहे. शिशु योजनेत 50 हजारापर्यंत किशोर योजनेत 50 हजार ते 5 लाखापर्यंत आणि तरुण योजनेत 5 लाख ते
10 लाखापर्यंत कर्ज देण्याची तरतूर आहे. या योजनेत कर्ज घेतांना काणतीही हमी देण्याची गरज नाही.
जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून सोलापूर जिल्हा कर्ज वितरणात राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे, अशी माहितीही श्री. पत्की यांनी दिली.
जिल्ह्यात मंजूर झालेल्या प्रकरणामध्ये शिशु गटाच्या 3 हजार 708 प्रकरणाची 166.88 कोटी, किशोर गटाच्या 3 हजार 708 प्रकरणासाठी 65.50 कोटी आणि तरुण गटाच्या 341 प्रकरणास 23.97 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
व्यवसायाचा परवाना, शॉपॲक्ट परवाना, जागा भाड्याची असल्याचे भाडे करारापत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड, मोठ्या कर्जासाठी खर्च – ताळेबंद, प्रोजक्ट रिपोर्ट महत्वाची कागदपत्रे कागदपत्रे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांने इतर योजनेखालील घेतलेल्या कर्जाची परतेड केलेली असावी.
कर्जास जामीनदाराची आवश्यकता नसून कर्जाचा बोजा संबंधित लाभधारकाच्या व्यवसायावर चटविला जातो. मुद्रा बँक कर्ज योजनेतून शेतीशी निगडीत व्यवसाय, उद्योगांना कर्ज वितरीत होत असल्याने या योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री.
पत्की यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment