सोलापूर दि. 01 : - सोलापुरातील विक्रीकर कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउददेशीय सभागृहात आज विक्रीकर दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त विजय काळम-पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, विक्रीकर विभागाचे सहआयुक्त् उमाकांत बिराजदार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की, विक्रीकर राज्याच्या महसुलात महत्वाचा वाटा टाकणारा कर आहे. आता नजिकच्या भविष्यात आपण विक्रीकराकडून सेवा आणि वस्तु कर प्रणालीकडे वळणार आहोत. त्या पार्श्वभूमीवर करसंकलनाचे प्रमाण कायम ठेवावे लागणार आहे. कर संकलन वाढवावाही लागणार आहे. कर संकलन वाढण्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. या पायाभूत सुविधा निर्मिती करण्यासाठी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल.यावेळी आयुक्त विजय काळम-पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांची भाषणे झाली.
यावेळी वासवदत्ता सिमेंटचे मनोज कोरले, किर्लोस्कर फेररुचे श्री.कुलकर्णी, लक्ष्मी ऑटोमोबाईल्सचे डी.के. पाटील, लक्ष्मी हायडोलिक्सचे संचालक शरद ठाकरे, मंगलोट मिनरल्सचे देशमुख, रामकृष्ण आयुर्वेदिक फार्मसीचे गणेश कुलकर्णी, निरामय मेडिकलचे हर्षल डबाल, सन ॲन्ड लोशन ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे राजकुमार दुरगुडे यांचा सत्कार करण्यात आला.
उत्कृष्ट कार्य करणा-या विक्रीकर अधिकारी एस.डी.वाघमोडे, एस.एस.रणसिंग,डी.बी.ढवळे, विक्रीकर निरीक्षक ए.एस.भुसे, व्ही.एस.म्हस्के, एस.एस.सुरवसे आणि नोटीस वाहक डी.एस.माने यांचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment