Friday, August 19, 2016

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 139 प्रकरणे निकाली


सोलापूर दि.19 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने आयोजित  राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 139 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीमध्ये एकूण दाखल पुर्व 2405 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 139 प्रकरणे निकाली निघाली तर तडजोडीने एकूण  72,11,999 रुपयांची वसूली झाली अशी माहिती विधी सेवा प्राधिकरण तर्फे देण्यात आली आहे.
                         या लोक अदालतीमध्ये सोलापूर जिल्हा व त्याअंतर्गत असणा-या तालुका न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या  प्रकरणांपैकी  2020 प्रकरणे अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी 180 प्रकरणे निकाली निघाली त्यामध्ये तडजोडीने 1,56,90,271 रुपयांची वसूली करण्यात आली.
                       या अदालतीचे उद्घाटन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा कंकणवाडी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सदस्य सचिव एस. टी. त्रिपाठी यांच्या  मार्गदर्शनाखाली झाले.ही लोकअदालत यशस्वी व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व विधिज्ञ व पक्षकारांचे सहकार्य लाभले.  
00000

No comments:

Post a Comment