Friday, August 12, 2016

मुंबई विधानभवनात शेतकरी बाजाराचे रविवारी उद्घाटन



पुणे, दि. 12 (विमाका): शेतकरी ते ग्राहक या योजनेंतर्गत मुंबई येथील विधान भवनामध्ये संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी बाजाराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. १४ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या शेतकरी बाजाराचे उद्घाटन होणार आहे. विधान भवनाच्या पी-४ पार्किंगमध्ये हा शेतकरी बाजार सुरु राहणार आहे. उद्घाटनास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, कृषी फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव स्वाधिक क्षत्रिय, पणन व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी उपस्थित राहणार आहेत, असे राज्याचे पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल आणि राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक एम.आर. मोरे यांनी कळविले आहे.
****


No comments:

Post a Comment