Monday, August 29, 2016

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव समितीची बैठक संपन्न


            पुणे दि. 29 : लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी दिलेल्या सिंहगर्जनेच्या शताब्दी वर्षानिमित्त  महाराष्ट्र शासनातर्फे सन 2016-17 मध्ये लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान व लोकमान्य उत्सव असे विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात  निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेंद्र मुठे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हयातील गणेश मंडळ पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक पार पडली. सदर बैठकीस शासनातर्फे गठीत लोकमान्य महोत्सव समितीच्या सदस्या श्रीमती मुक्ताताई टिळक, श्री. सुरेश सरनोबत यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत सदर विविध कार्यक्रम राबविणेबाबत सांगोपांग चर्चा करणेत आली.
            लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान अंतर्गत जिल्हयातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या स्पर्धा आयोजित करुन गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांची चतु:सुत्री तसेच अन्य उपक्रमांव्दारे जनजागृती घडवतील अशा सार्वजनिक गणेश मंडळांची स्पर्धा आयोजित करुन गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळांची पध्दत देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदि विषयांबाबत मुल्यांकन करुन शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा ,‍विभागीय स्तरावर दिलेल्या मंडळांचा गौरव करण्यात येणार आहे.
            सदर स्पर्धेसाठीचे अर्ज ग्रामीण भागाकरीता तालुका गक्षणाधिकारी यांचेकडे शहरी भागाकरीता महानगरपालिका  शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी यांचेकडे  दिनांक 4 सप्टेंबर 2016 पर्यंत जमा करावयाचे आहेत. तालुका, जिल्हा  विभागीय  स्तरावरील समितीमार्फत प्रथम, ‍व्दितीय व तृतीय क्रमांकासाठी बक्षिसे देवून गौरव करण्यात येणार असून याकरीता मुल्यांकन पध्दती निश्चित करणेत आली आहे. सदर समितीमार्फत दिनांक 8 सप्टेंबर 2016 ते 12 सप्टेंबर 2016 पर्यंत समिती सदस्यांमार्फत भाग घेतलेल्या मंडळांचे  परिक्षण व मुल्यांकन करणेत येणार आहे.
            सदर बैठकीत उपस्थित मंडळांनी सक्रीय सहभाग घेणेचे आश्वासन दिले तसेच सदर स्पर्धेची जाहिर प्रसिध्दी व्हावी व अर्ज ऑनलाईन उपलब्ध व्हावेत ही मागणी केली बैठकीस श्रीमंत दगडुशेठ हलवाई ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. महेश सुर्यवंशी तसेच  शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री. हरुन आतार, पोलीस उपायुक्त्श्री. बरकत मुजावर व इतर पदाधिकारी  उपस्थित होते.

                                                                        0000

No comments:

Post a Comment