Tuesday, August 23, 2016

वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन


पुणेदि.23 : चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज स्विकारण्यात येणार आहेत व लिलाव कार्यपद्धती वापरण्यात येणार आहेअसे प्रादेशिक परिवहन अधिकारीपुणे यांनी कळविले आहे.
            चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क ( तीनपट शुल्क )भरुन हवे असतील त्यांनी 1 सप्टेंबर, 2016 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10-30 ते दुपारी 2-30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करावा.
            अर्ज प्रादेशिक कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी.डीपत्त्याचा पुरावाओळखपत्रपॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा.डीडी प्रादेशिक परिवहन अधिकारीपुणे यांच्या नावे राष्ट्रीयीकृत/शेड्युल्ड बँकपुणे येथील असणे आवश्यक आहेअर्जदाराने अर्जासोबत फोटो ओळखपत्र (उदाआधार कार्ड/निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/पासपोर्टपॅन कार्ड इ.) ची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
            एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 2 सप्टेंबर, रोजी 10-30 वाकार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहेलिलावाकरिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयचा असेल तर त्यांनी दुपारी  3-00 वाजेपर्यंत सीलबंद पाकीटात प्रादेशिक कार्यालयात जमा करावात्याच दिवशी दुपारी  4-00 वासहकार सभागृहप्रादेशिक परिवहन कार्यालयपुणे येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व सहाप्रादेशिक अधिकारी यांच्या उपस्थित पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदारलिफाफे उघडून अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डी.डीसादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईलराखून ठेवलेला क्रमांक ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईलफी कोणत्याही परिस्थिती परत केली जाणार नाही अथवा समायोजन करता येणार नाहीअसे पत्रकात  नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment