Friday, August 12, 2016

गुंजवणी धरण बंद पाईप लाईन योजनेचे काम कालबध्द कार्यक्रमानुसार पूर्ण करा - राज्यमंत्री विजय शिवतारे


पुणे, दि.१२: गुंजवणी धरण बंद पाईप योजना ही सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे या योजनेचे काम जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजित कालबध्द कार्यक्रमानुसार पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केल्या.
      येथील नवीन शासकीय विश्रामगृहात गुंजवणी बंद पाईप लाईन योजनेचा आढावा जलसंपदा राज्यमंत्री श्री. शिवतारे यांनी घेतला. यावेळी निरा देवधर योजनेचे अधिक्षक अभियंता ईश्वर चौधरी, अधिक्षक अभियंता अतुल कपोले, कार्यकारी अभियंता बी. आर.पवार, उप अभियंता भरत वायसे, दिगंबर डुबल यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
      श्री. शिवतारे म्हणाले, गुंजवणी बंद पाईप योजना अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे या योजनेच्या कामाचा सर्व्हे अहवाल संबंधित सर्व्हेर एजन्सीने दि. ३० ऑगस्ट 2016 पूर्वी कार्यकारी अभियंत्यांना सादर करावा. दि. १५ सप्टेबर 2016 रोजी डिझाईन आणि ड्रॉईंग करुन तो कार्यकारी अभियंत्यांना सादर करावा. तसेच ३० सप्टेबर 2016 रोजी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून मंजूर करून तो शासनाला सादर करावयाचा आहे. तो पंधरा दिवसात महराष्ट्र जलसंपदा प्राधिकरणाकडून प्रमाणीत करुन घेणे आपेक्षीत आहे. त्यानंतर तो डिसेंबर 2016 रोजी येणाऱ्या महामंडळ बैठकीत अथवा त्रीसदस्यीय बैठकीत सादर करावा. गुंजवणी बंद पाईप लाईनचा विषय तातडीने मार्गी लागण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कालबध्द कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. शिवतारे यांनी यावेळी दिल्या.   
******


No comments:

Post a Comment