Friday, August 12, 2016

संजय गांधी निराधार अनुदान योजनांच्या लाभार्थ्याच्या यादीचे वाचन

                                
पुणे दि. 12  :  संजय गांधी निराधार अनुदान योजनांच्या लाभार्थ्याच्या  यादीचे वाचन करून त्यांना या योजनेची माहिती देण्यासाठी 15 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृतीवेतन  योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय  विधवा निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांनी आपल्या भागातील पुणे महानगरपलिकेच्या क्षेत्रिय कार्यालयात उपस्थित राहावे. यावेळी महानगरपलिकेचे संबंधित महापालिका सहायक आयुकत उपस्थित राहणार आहेत असे आवाहन पुणे शहर संजय गांधी निराधार योजनेचे तहसिलदार श्रीमती अर्चना शेटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ  निवृत्तीवेतन, योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृतीवेतन  योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय  विधवा निवृत्तीवेतन योजना या योजनांची माहिती घ्यावी. मतदारसंघाची नावे व लाभार्थ्याची यादी वाचन स्थळ पुढीलप्रमाणे आहे. कॅन्टोंमेंट मतदार संघामधील लाभार्थ्याची यादी वाचन कै.बा..ढोले पाटील रोड, क्षेत्रीय कार्यालय, येरवडा, पुणे, कसबा मतदार संघातील लाभार्थ्याची यादी वाचन विश्रामबाग वाडा, क्षेत्रीय कार्यालय, शनिपार जवळ, पुणे, शिवाजीनगर मतदार संघातील लाभार्थ्याची यादी वाचन औंध क्षेत्रीय कार्यालय, घुलेरोड, पुणे, तसेच पर्वती मतदार संघातील लाभार्थ्याची यादी वाचन बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, स्वारगेट, पुणे येथे होणार आहे.
                                                       00000


No comments:

Post a Comment