Tuesday, August 23, 2016

माजी सैनिकांना नोकरीची संधी


सातारा, दि. 22 (जिमाका) : माजी सैनिकांना संसद (दिल्ली) येथे नोकरी मिळविण्यासाठी  इ.12 वी सायन्स (पीसीएम) किंवा डिप्लोमा (कॉम्प्यूटर सायन्स, कॉम्प्यूटर इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्यूनिकेशन) शिक्षण असणा-या सैनिक उमेदवारांकडून दि. 5 सप्टेंबर 2016 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर. जाधव यांनी दिली आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज www.loksabha.nic.in under link 'Recruitment' वरुन प्राप्त करुन अर्ज दिनांक 5 सप्टेंबर 2016 पर्यंत द जॉईंट रिक्रूटमेंट सेल रुम नं. 521, पार्लमेंट  हाऊस अनेक्स न्यू दिल्ली-110001 या पत्यावर पोहचणे अनिवार्य आहे. अधिक माहिती करीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे समक्ष भेटावे. पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment