Monday, August 22, 2016

राष्ट्रपती दौऱ्यात संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - अपर जिल्हाधिकारी प्रविण देवरे


सोलापूर दि. 22 :-   भारताचे महामहिम राष्ट्रपती  प्रणब मुखर्जी यांचा दौरा दि. 4 सप्टेंबर रोजी असून या दौऱ्या दरम्यान सर्व शासकीय यंत्रणांनी आप-आपसात समन्वय ठेवून राष्ट्रपती महोदयांचा दौरा यशस्वी करावा,             असे आवाहन अपर जिल्हाधिकारी प्रविण देवरे यांनी केले.
                    राष्ट्रपती महोदयांचा संभाव्य दौरा 4 सप्टेबर रोजी होत असून याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयेाजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतु सभागृहात करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, या दौऱ्यात राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल भंग होणार नाही याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी.
                    या बैठकीसाठी  निवासी उपजिल्हाधिकारी  अजित रेळेकर, मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, मनपा उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, बजरंग खरमाटे, डॉ. मल्ल्किार्जून पट्टणशेट्टी, सागर धोमकर,        धनंजय औंढेकर, अग्निशामक दलाचे केदार आवटे, प्रांताधिकारी शहाजी पवार, माजी खा. धर्मण्णा सादूल,         माजी आ. प्रकाश यलगुलवार, श्रीमती निर्मला ठोकळ, सुधिर खरटमल, लक्ष्मण चलवादी, विलास मोरे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment