Monday, August 29, 2016

बास्केटबॉल व टेबल टेनिस स्पर्धेंच्या कार्यक्रमात बदल


सातारा, दि. 29  (जिमाका) :  जिल्हा क्रीडा परिषदेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल व टेबल टेनिस स्पर्धेंच्या आयोजन कार्यक्रमामध्ये तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी दिली आहे.
कोल्हापूर विभागीय बास्केटबॉल स्पर्धांच्या आयोजन कार्यक्रमात बदल झाल्यामुळे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धांच्या नियोजीत कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला असून सुधारीत कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 9 सप्टेंबर 2016 रोजी 14 वर्षाखालील मुले व मुली, दि.10 सप्टेंबर रोजी 17 वर्षाखालील मुले व मुली आणि 11 सप्टेंबर रोजी 19 वर्षाखालील मुले व मुली यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे होणार आहेत.

तसेच जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धांच्या आयोजन ठिकाणामध्ये काही तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात आला असून ही स्पर्धा दि.20 सप्टेंबर रोजी 14,17, 19 वर्षाखालील मुले, दि.21 सप्टेंबर रोजी 14, 17.19 वर्षाखालील मुली यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन शिवाजी उदय मंडळ, मंगळवार पेठ, सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी संबंधित संघटना, खेळाडू, क्रीडा शिक्षक, शाळांचे मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02162-237438 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment