Monday, August 22, 2016

धार्मिक कारणासाठी वर्गणी गोळा करण्याचा परवाना ऑनलाईन


पुणे, दि. 22 (विमाका): धार्मिक कार्यक्रम व सामाजिक कारणासाठी वर्गणी आणि निधी गोळा करण्याकरिता विविध संस्थांना धर्मादाय आयुक्तांकडून तात्पुरता परवाना देण्यात येतोया परवान्यासाठी नोंदणी या वर्षीपासून ऑनलाईन पध्दतीने करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहेअशी  माहिती पुणे विभागाच्या धर्मदाय सह आयुक्तांनी दिली आहे.
 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ क  अंतर्गत धार्मिक कार्यक्रम व आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देण्यात येते. कार्यालयातील प्रशासन गतीमान व पारदर्शक होण्यासाठी या वर्षीपासून ऑनलाइन नोंदणी पद्धतीनेही सदरची परवानगी देण्याचे काम सुरु करण्यात आले आहेत.
नागरिकांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या www.charity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावीसंकेतस्थळा वर जावून लॉग इन करावे. Register User यावर करून आवश्यक ती माहिती भरावी. Create झालेल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग इन करावे. Menu मधील Registrer An Event (41 C) यावर क्लिक करावे व आवश्यक ती माहिती भरावी व Submit करावे. त्यानंतर अर्जदारास Auto generated क्रमांक मिळेल. नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असेही आवाहन एका पत्राकन्वये केले आहे.
****

No comments:

Post a Comment