“भाग्यश्री” योजनेच्या लाभार्थ्यांना
पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
पुणे, दि.15 : “माझी कन्या भाग्यश्री” योजनेच्या लाभार्थ्यांना
येथील विधानभवनात जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात
प्रमाणपत्रे देण्यात आली.
तसेच शिक्षण विभागाच्यावतीने राष्ट्रीय प्रज्ञा
शोध परिक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी पालकमंत्री यांच्या हस्ते
प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.
यावेळी जि.प. अध्यक्ष प्रदिप कंद, आ. भिमराव
तापकीर, आ. मेधा कुलकर्णी, जि.प. उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे,
विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव आदि मान्यवर उपस्थित होते.
0000



No comments:
Post a Comment