Saturday, August 13, 2016

सायबर लॅबचे स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री बापट यांच्या हस्ते उदघाटन




सायबर लॅबचे  स्वातंत्र्यदिनी
पालकमंत्री  बापट यांच्या हस्ते उदघाटन

पुणे,दि.14 : सध्या इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरुन गुन्हा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत 'महाराष्ट्र सायबर प्रकल्प' राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांतर्गत पुणे पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे सायबर लॅब स्थापन करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन 15 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10 वाजता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते होणार आहे.
या सायबर लॅबच्या मदतीने पोलीसांना सायबर गुन्हयांच्या प्रमाणामध्ये व्हिडिओ फॉरेन्सीक, मोबाईल फॉरेन्सीक, संगणक हार्डडिस्क फॉरेन्सीक, मोबाईल सीडीआर ॲनेलिसीस आदि तपासणी होणारआहे. याद्वारे पुरावे उपलब्ध होऊन सायबर गुन्हेगारीवर वचक बसण्याबरोबरच गुन्हयांची उकल तात्काळ होण्यांसाठीही आरोपीचा शोध लागण्यास मदत होणार आहे. सदर आधुनिक सायबर लॅबचे कामकाज सायबरक्राईम सेल,गुन्हे शाखा, पुणे यांच्या निगराणी खाली असणार आहे.
00000

No comments:

Post a Comment