Saturday, August 20, 2016

जिल्हयातील प्राचार्यांना आवाहन


सोलापूर दि.20: - मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्ष फी व इतर योजनांचा लाभ देण्यात येतो  अशा संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्याबाबत जिल्हयातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची, लिपिकांची दिनांक 23 ऑगस्ट रोजी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (अशोक चौक) सोलापूर याठिकाणी दुपारी 12 वाजता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
                     जिल्हयातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यानी व लिपिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
                                                                            0 0 0 0

No comments:

Post a Comment