Friday, August 12, 2016

शेतकरी कृषी उत्पन्न संस्थांना सहकार मंत्र्यांच्याहस्ते परवान्याचे वाटप

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत पणन मंडळ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

            पुणे, दि. 12 –  शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकविलेला कृषी माल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी पणन मंडळातर्फे शेतकऱ्यांना परवाना देण्यात येतो. राज्याचे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते आज पंधरा शेतकरी कृषी उत्पन्न संस्थांना पणन मंडळाच्या कार्यालयात परवान्याचे वाटप करण्यात आले. अर्ज केल्यापासून एक दिवसाच्या आंत सदरहू परवाने वितरीत करण्यात आल्याबद्दल संबधित सस्थांनी यावेळी पणन मंडळाचे आभार मानले.
सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत पणन मंडळ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न
            राज्याचे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत आज पणन मंडळातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बाजार समित्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, बाजार समित्यांचे वैधानिक लेखा परिक्षण करणे, शेतमालावर घेण्यात येणाऱ्या आडत, तोलाई हमाली, प्रक्रिया करुन निर्यात करण्यात येणारा कृषी यावर धोरण ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
            या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये पणन संचालक डॉ.किशोर तोष्णीवाल, पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलींद आकरे, कार्यकारी संचालक मारोतीराव मोरे, कृषी पणन मंडळ पणन विभागाचे अधिकाऱ्यांनी भाग घेतला.
000



No comments:

Post a Comment