Monday, August 22, 2016

प्रतिबंधात्मक आदेश


            पुणेदि. 22: गणेशोत्सव सुरळीतपणे पार पडण्यासाठी पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त सुनिल रामानंद यांनी मुंबई पोलीस कायदा सन1951 चे कलम 36 अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारानुसार पुणे शहरातील सर्व पोलीस ठाणे स्वाधीन अधिकारी यांना लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात केले आहे.
            या अधिकारान्वये  रस्त्यावरुन जाणाऱ्या अगर मिरवणुकीत व्यक्तींचे वागणे अगर कृत्य करण्याबाबत आदेश देणे, ज्या मार्गाने मिरवणुक जाईल किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ती वेळ व मार्ग निश्चित करणे व सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊड स्पिकरची वेळ, पध्दती, ध्वनी तीव्रता व आवाजाची दिशा यांचे नियंत्रण करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे स्वाधीन अधिकारी यांना लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान केले आहे.
             हे प्रतिबंधात्मक आदेश 2 सप्टेंबर,2016 च्या रात्री 00-01 पासून 16 सप्टेंबर, 2016 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहतील. याआदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा सन 1951 च्या कलम 134 नुसार शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.
***

प्रतिबंधात्मक आदेश
            पुणेदि. 22: गणेशोत्सव सुरळीतपणे पार पडण्यासाठी पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त सुनिल रामानंद यांनी फौजदारी प्रक्रिया संहितासन 1973 चे कलम 144 अन्वये पुणे शहरात 2 सप्टेंबर, 2016 रोजीचे रात्रैा 00-01  वा.पासून दि16 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत या वेळेसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी  केला आहे.
            या आदेशान्वये कोणत्याही रस्त्यात अथवा सार्वजनिक जागेत अथवा कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर अगर मिरवणुकी दरम्यान कोणत्याही ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस, इ. आगीचा लोळ निर्माण  करणेस किंवा हवेत सोडणेस मनाई करण्यात येत आहे.  आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील असेही आदेशात नमूद केले आहे.
*****

No comments:

Post a Comment